Home अहमदनगर माजी महापौर संदीप कोतकर यांच्या बंगल्यात चोरी

माजी महापौर संदीप कोतकर यांच्या बंगल्यात चोरी

Sandip Kotkar Home theft 

अहमदनगर: अहमदनगर शहरातील केडगाव येथील माजी महापौर संदीप कोतकर व भानुदास कोतकर यांच्या बंगल्यात बुधवारी रात्री चोरी झाल्याची घटना घडली आहे.

घरामधील रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी लांबविले आहे. यामध्ये ३ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याचे समोर आले आहे. सुरेखा भानुदास कोतकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

या फिर्यादीनुसार बुधवारी रात्री कोटकर कुटुंब एकत्र झोपले होते. रात्री ११ वाजेच्या सुमारास सुप्रिया  कोतकर यांनी सुरेखा कोतकर यांना फोन आला. त्यांच्याकडून सांगण्यात आले की, घरात आवाज येत आहे. तुम्ही बाहेर येऊ नका. त्यानंतर घराच्या मागे पळण्याचा आवाज आला. त्यानंतर आम्ही सर्व घराची पाहणी केली. त्यामध्ये बेडरूममध्ये असलेल्या कपाटाचे लोकं तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. यामधील सोन्या चांदीचे दागिने व रक्कम असा सुमारे ३ लाख ९० हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.  

Web Title: Sandip Kotkar Home theft 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here