धक्कादायक! दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार, सुरक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्न
Nagpur Crime: १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला खेळण्याच्या बहाण्याने जवळच्या गोठ्यात नेऊन बलात्कार (Rape) तर कन्हान पोलीस ठाणे हद्दीत ११ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याने गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात या घटना घडल्याने येथील सुरक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
नागपूर : काटोल आणि कन्हान पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याबाबत कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पहिली घटना काटोल पोलीस ठाणे हद्दीत घडली. येथे आरोपी तुषार नागोसे (२८) याने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला खेळण्याच्या बहाण्याने जवळच्या गोठ्यात नेले. येथे त्याने मुलीवर अत्याचार केला व ठार मारण्याची धमकी दिली.
दुसरी घटना २६ एप्रिलला कन्हान पोलीस ठाणे हद्दीत घडली. येथे लक्ष्मीकांत गेडाम (३०) या आरोपीने एका ११ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. दोन्ही प्रकरणात पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात या घटना घडल्याने येथील सुरक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे.
Web Title: Rape of two minor girls, the serious question on the security system
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App