Home क्राईम साखरपुड्यानंतर भावी पत्नीला महाबळेश्वरला नेत लैंगिक अत्याचार, ५ लाख २२ हजार रुपयांची...

साखरपुड्यानंतर भावी पत्नीला महाबळेश्वरला नेत लैंगिक अत्याचार, ५ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक, बापलेकावर गुन्हा

Pimpri Crime:  तरुणाने होणाऱ्या पत्नीला तिच्या मनाविरुद्ध महाबळेश्वर येथे नेऊन लैंगिक अत्याचार (Sexual abuse ) केल्याचा आरोप आहे. तसेच तिची जवळपास ५ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

Sexual abuse by taking the future wife to Mahabaleshwar after the engagement, fraud of Rs 5 lakh 22 thousand

पिंपरी : साखरपुडा झाल्यानंतर तरुणाने होणाऱ्या पत्नीला तिच्या मनाविरुद्ध महाबळेश्वर येथे नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच तिची जवळपास ५ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. पिंपरी परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी बापलेक दोघा जणां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कुणाल संतोष चौधरी आणि संतोष चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी एका २२ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कुणाल चौधरी आणि फिर्यादी यांचा २ एप्रिल २०२२ रोजी साखरपुडा झाला. यानंतर आरोपीने फिर्यादीला जबरदस्तीने महाबळेश्वर येथे फिरायला नेले. त्यानंतर तिच्या मनाविरुद्ध तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित केले.

त्यानंतर आरोपी आणि त्याचे वडील संतोष चौधरी यांनी तिचा विश्वास संपादन करून शेअर मार्केटमध्ये घेतलेले पैसे फेडण्याकरता कर्ज काढायला लावले. त्यानंतर पिंपरी येथील संत तुकाराम नगर येथील फिर्यादीच्या घरून सुमारे ५ लाख २२ हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने घेऊन फिर्यादीची फसवणूक केली.

पैसे परत न करता किरकोळ कारणावरुन तिच्याशी भांडणे करण्यास सुरुवात केली. तिच्यावर संशय घेत तुझ्याकडून फक्त पैसे घेण्याकरिता लग्न जमावले होते, असे सांगत आरोपीने मी तुझ्याशी लग्न करणार नाही, परत जर पैसे मागायला आलीस तर तुला आणि तुझ्या घरच्यांना मारून टाकीन अशी धमकी देत फसवणूक केली आहे. यानंतर महिलेने पोलिसात धाव घेत आरोपी बाप लेकाविरोधात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींचा शोध सुरू आहे.

Web Title: Sexual abuse by taking the future wife to Mahabaleshwar after the engagement, fraud of Rs 5 lakh 22 thousand

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here