Home जळगाव वादळी वाऱ्याने उभा कंटेनर उलटला; आडोशाला असलेल्या दोघांचा मृत्यू, Weather update

वादळी वाऱ्याने उभा कंटेनर उलटला; आडोशाला असलेल्या दोघांचा मृत्यू, Weather update

Weather update: अवकाळी पावसाचा वादळी वाऱ्याचा तडाखा, वादळी पावसात वाऱ्याच्या तडाख्यात उभा कंटेनर उलटल्याने आडोशाला उभे असलेल्या दोन जणांचा कंटेनरखाली दबून मृत्यू झाल्याची घटना.

Weather update container overturned by a gale Two died

जळगाव:  जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसाचा वादळी वाऱ्याचा तडाखा सुरू असल्याने काल धक्कादायक घटना घडली. वादळी पावसात वाऱ्याच्या तडाख्यात उभा कंटेनर उलटल्याने आडोशाला उभे असलेल्या दोन जणांचा कंटेनरखाली दबून मृत्यू झाल्याची घटना घडली. तसेच एक जण गंभीर जखमी आहे.

जळगाव जिल्ह्यातील चिंचोली गावाजवळ काल दुपारी ही घटना घडली. भोला श्रीकुसूम पटेल, चंद्रकांत वाभळे असे मयत झालेल्या कामगारांचे नावे आहेत. जखमी व्यक्तीस जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी  की, जळगाव तालुक्यातील चिंचाली गावाजवळ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकामाचे काम सुरू आहे. या ठिकाणी काही बिहारी मजूर हे दोन महिन्यांपासून काम करत आहे. गुरुवारी (दि. २७) दुपारी तीनच्या सुमारास वादळी पावसाने हजेरी लावली. यावेळी वादळापासून जीव वाचविण्यासाठी मजूरांनी पत्र्याच्या शेडमध्ये धाव घेतली. मात्र, वादळी वाऱ्यामुळे पत्र्याचे शेड देखील उडाले. त्यामुळे मजुरांनी पटांगणात उभा असलेल्या कंटेनरच्या बाजूला आडोसा घेतला होता. वादळी पावसात वाऱ्याच्या तडाख्यात उभा कंटेनर उलटल्याने आडोशाला उभे असलेल्या दोन जणांचा कंटेनरखाली दबून मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे.

Web Title: Weather update container overturned by a gale Two died

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here