Home क्राईम संगमनेर शहरात मुलीचा सलग पाठलाग करत तिची छेड काढणाऱ्या तरुणाविरोधात रात्री पोक्सो...

संगमनेर शहरात मुलीचा सलग पाठलाग करत तिची छेड काढणाऱ्या तरुणाविरोधात रात्री पोक्सो अंतर्गत गुन्हा

Sangamner Crime:  एका दुकानात काम करणाऱ्या मुलीचा सलग दोन दिवस पाठलाग करत तिची छेड काढणाऱ्या तरुणाविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल.

Crime case under POCSO was registered against a young man who chased a girl continuously and molested

संगमनेर: नवीन नगर रोड परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून एका दुकानात काम करणाऱ्या मुलीचा सलग दोन दिवस पाठलाग करत तिची छेड काढणाऱ्या तरुणाविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमान शब्बीर सय्यद (कब्रस्थान जवळ, नाईकवाडपुरा, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, नुकतेच बारावीचे पेपर दिलेली अल्पवयीन मुलगी गेल्या चार-पाच दिवसांपासून नवीन नगर रोड परिसरातील एका दुकानांमध्ये काम करत असून बुधवारी डोक्यात मुस्लिम समाजात घातली जाते तशी पांढरी टोपी घातलेला मुलगा दुकानातील या मुलीकडे बघत एक सारख्या फेऱ्या मारत हाताच्या इशाऱ्याने तिला हाय करत होता.

संध्याकाळी सातच्या सुमारास ही मुलगी घरी जात असताना या मुलाने तिचा छुपा पाठलाग करत नवीन नगर रोडवरील प्रशासकीय इमारतीजवळ शुक शुक करत तिला थांबविले. यावेळी मुलीने त्याला दुकानासमोर चकरा मारत असताना विनाकारण हाय करत होतास, आता माझ्या पाठीमागे पाठलाग करत आलास, तू कोण आहेस, मी सामान्य कुटुंबातील मुलगी असून माझ्या नादी लागू नकोस, असे त्याला सांगत निघून जाण्यास सांगितले. तू जशी पण असशील तशी मला चालेल, असे त्या मुलाने तिला म्हटल्यानंतर घाबरलेली ती मुलगी पुढे चालू लागली. त्याने पुन्हा तिचा पाठलाग केल्याने तिने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तो तिथून पळून गेला. घरी गेल्यानंतर मुलीने हा प्रकार आई आणि बहिणीला सांगितला होता.

त्यामुळे दुसऱ्या दिवशी गुरुवारी संध्याकाळी हा मुलगा पुन्हा दुकानासमोर आल्यानंतर मुलीने फोन करून याची माहिती घरच्यांना दिली. संध्याकाळी ही मुलगी घरी परतत असताना तिची आई आणि बहीण तिच्या मागे काही अंतरावर होते. या दरम्यान हा मुलगा पुन्हा तिचा पाठलाग करत होता. याची मुलीने आई-बहिणीला माहिती दिल्यानंतर त्यांनी या मुलाला एका रुग्णालयासमोर पकडले असता तो त्यांच्या तावडीतून निसटून पळून जाऊ लागला.

त्यामुळे परिसरातील काही लोकांनी त्याला पुन्हा पकडले. तेथून त्याला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलीस चौकशीत त्याने त्याचे नाव अमान शब्बीर सय्यद असे असल्याचे सांगितलें. पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपी सय्यद याच्या विरोधात छुपा पाठलाग करणे, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक पुढील तपास करत आहे.

Web Title: Crime case under POCSO was registered against a young man who chased a girl continuously and molested

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here