Home क्राईम डॉक्टरचा ३२ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार, क्लिनिकमध्येच धक्कादायक प्रकार

डॉक्टरचा ३२ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार, क्लिनिकमध्येच धक्कादायक प्रकार

Pune Crime:  ३२ वर्षीय महिलेशी बळजबरी शारीरिक संबंध (Rape) ठेवून, तिची इच्छा नसतानाही वारंवार पाठलाग करत मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर.

A Doctor rape a 32-year-old woman

पुणे : ३२ वर्षीय महिलेशी बळजबरी शारीरिक संबंध ठेवून, तिची इच्छा नसतानाही वारंवार पाठलाग करत मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना १ जुलै २०२२ पासून आतापर्यंत घडल्याचा आरोप आहे. पुण्यातील मांगडेवाडी कात्रज या ठिकाणी कल्पना आनंद क्लिनिकमध्ये प्रकार घडला आहे.  या प्रकरणी पीडित महिलेने डॉक्टर विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केल्याची माहिती शुक्रवारी दिली आहे.

डॉ. अमित आनंदराव दबडे (वय २९ वर्ष, रा. आंबेगाव खुर्द, पुणे) असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टर अमित दबडे याचे कात्रज परिसरात मांगडेवाडी या ठिकाणी कल्पनानंद क्लिनिक आहे. सदर क्लिनिकमध्ये तपासणी करण्याकरीता पीडित महिला आल्यानंतर, त्याची तिच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर डॉक्टरने महिलेचा मोबाईल क्रमांक घेऊन तिला मोबाईल फोनवर मेसेज आणि कॉल करून तिच्याशी गोड गोड बोलून त्याच्या हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतले. त्यानंतर तिचा हात धरून तिच्या छातीला हात लावून परत सदर प्रकाराबाबत माफी मागण्याच्या बहाण्याने तिला क्लिनिकमध्ये बोलावून घेतले.

त्यानंतर तिला इंजेक्शन घेण्यासाठी कमरेवरचे कपडे खाली करण्यास सांगत, त्याने तिच्यासोबत जबरदस्तीने तिची संमती नसतानाही शारीरिक संबंध करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यानंतरही महिलेची इच्छा नसताना तिचा वारंवार पाठलाग करून तिला डॉक्टरने त्रास दिला. अखेर याबाबत महिलेने पोलिसांकडे धाव घेत, डॉक्टर विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला. याबाबत महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक एस तावडे अधिक तपास करत आहेत.

Web Title: A Doctor rape a 32-year-old woman

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here