Home महाराष्ट्र वीज पडून शाळकरी मुलीचा मृत्यू

वीज पडून शाळकरी मुलीचा मृत्यू

Latur News:  शेतातील एका झाडाखाली थांबली व नेमकी तिथे वीज कोसळली  (lightning strike) व मुलीचा  मृत्यू झाल्याची घटना.

School girl dies due to lightning strike

निलंगा: तालुक्यात दुपारी झालेल्या अवकाळी पावसात मुबारकपूर तांडा येथील आरुषी नथुराम राठोड (वय१३) हिचा अंगावर वीज कोसळल्याने गुरुवारी (दि.२७) तिचा जागीच मृत्यू झाला. आरुषी बकऱ्यांना चराईसाठी शेतात घेऊन गेली. होती. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह जोराचा पाऊस सुरू झाला. निवाऱ्यासाठी ती शेतातील एका झाडाखाली थांबली व नेमकी तिथे वीज कोसळली व तिचा मृत्यू झाला. दरम्यान निलंगा तालुक्यातील अन्य गावांतही या वादळी पावसाने थैमान घातले. होसूर शिवारास गारपीटीने झोडपल्याने रानावर राशीसाठी ठेवलेल्या ज्वारीचे नुकसान मोठे झाले

बालाजी प्रल्हाद बिरादार यांचे वीज पडून दोन बैल, तगरखेडा येथे धनराज हिरागिर गिरी यांची म्हैस व हरीजवळगा येथे रतगीर महाराज यांचे तीन बैल मरण पावले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, निलंगा तालुक्यात वीज पडून दहा गुरे दगावली आहेत. शहरात आठवडी बाजारात या पावसाने मोठी धावपळ उडाली.

Web Title: School girl dies due to lightning strike

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here