इन्स्टाग्रामवरील मैत्री शारीरिक अत्याचार, बेल्टने मारहाण अन् सिगारेटचे चटके
Nagpur Crime: एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला इन्स्टाग्रामवर झालेल्या मैत्रीत अतिविश्वास ठेवणे महागात पडले. आरोपीने तिच्यावर शारीरिक अत्याचार (Rape) केले व लग्नासाठी विचारल्यावर बेल्टने मारहाण करत अगदी सिगारेटचे चटके देत तिचा छळ.
नागपूर : एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला इन्स्टाग्रामवर झालेल्या मैत्रीत अतिविश्वास ठेवणे महागात पडले. आरोपीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केले व लग्नासाठी विचारल्यावर बेल्टने मारहाण करत अगदी सिगारेटचे चटके देत तिचा छळ केला. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा तर दाखल केला आहे, मात्र आरोपी अद्यापही फरार आहे.
अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थिनीची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून प्रशांत परिहार (वय २३, कुंभारटोली, नंदनवन) याच्याशी ओळख झाली.
एप्रिल २०२० मध्ये ही ओळख झाली व काही दिवसांतच त्यांच्यात मैत्री झाली. प्रशांतने तिच्यावर प्रेम असल्याचे नाटक केले व विद्यार्थिनी त्याच्या जाळ्यात फसली. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले व वेळोवेळी तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. विद्यार्थिनी त्याला ज्यावेळी लग्नाबाबत विचारायची तेव्हा तो संतापायचा. त्याने संतापाच्या भरात काहीवेळा तिला शिवीगाळ करत बेल्टने मारहाणदेखील केली. तसेच तिच्या शरीरावर सिगारेटचे चटके देत जीवे मारण्याची धमकी दिली. २५ एप्रिलपर्यंत हा प्रकार सुरू होता.
Web Title: Rape Case Friends on Instagram physical abuse, belt beatings, and cigarette burns
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App