Home Uncategorized दुचाकीवरून जाणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

दुचाकीवरून जाणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

Ahmednagar News:  दुचाकीवरून जेवण करण्यासाठी जात असताना कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराचा त्रास झाल्याने उपचारापूर्वीच मृत्यू (died) झाल्याची घटना घडली आहे.

policeman passing by on a two-wheeler died of a heart attack

कोपरगाव: दुचाकीवरून जेवण करण्यासाठी जात असताना कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराचा त्रास झाल्याने उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. २६) रात्री ८:१५ वाजताच्या सुमारास कोपरगाव शहरातील नवश्या गणपती मंदिर व स्वामी समर्थ केंद्रासमोरील रस्त्यावर घडली.

राजू तुकाराम चव्हाण (रा. घुमटवाडी, ता. पाथर्डी) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते पोलीस नाईक या पदावर कार्यरत होते. याप्रकरणी प्रेमदास तारू पवार (वय ४५, रा. वागळुज, ता. आष्टी, जि. बीड) यांच्या खबरीवरून कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस कर्मचारी राजू चव्हाण यांच्या अकस्मात निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. स्व. चव्हाण यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Web Title: policeman passing by on a two-wheeler died of a heart attack

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here