Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: पतीने केली पत्नीची निर्घुण हत्या

अहमदनगर ब्रेकिंग: पतीने केली पत्नीची निर्घुण हत्या

Ahmednagar News:  पत्नीच्या पायावर व डोक्यावर कुर्‍हाडीसारख्या धारदार शस्त्राने वार करून जीवे ठार (Murder) मारल्याची घटना.

Husband brutally murder his wife

श्रीरामपूर: पतीने पत्नीच्या पायावर व डोक्यावर कुर्‍हाडीसारख्या धारदार शस्त्राने वार करून जीवे मारल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील स्वामी सहजानंद भारती मंदिरानजीक राहत असणार्‍या देसाईवस्ती येथे घडली. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

निर्मला शांताराम देसाई (वय अंदाजे 45) असे या घटनेत मृत झालेल्या पत्नीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके  यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत पोलिसांना योग्य त्या सुचना केल्या. पोलिसांनी पती शांताराम देसाई याला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, , नाऊर येथील देसाई कुटुंब एकमेव स्वतंत्र वस्तीत राहत होते, गेल्या अनेक वर्षापासून पती-पत्नीमध्ये काही ना काही कारणाने वाद  होत होते, पती शांताराम हा मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होता तसेच नशेत गावात दहशत देखील करीत असल्याने घटनास्थळी गावातील कुणीही यायला तयार नव्हते.

समजलेल्या माहितीनुसार दोन दिवसापूर्वी पती-पत्नीमध्ये वाद झाल्याने पत्नी निर्मला ही नायगाव येथे राहत असलेले आरोपी शांताराम याचे मोठे भाऊ वसंत देसाई यांच्या वस्तीवर गेली होती. शांताराम याला दोन दिवसापासून जेवणासाठी काहीही मिळत नसल्याने तो रागात व नशेत सकाळी नायगाव येथील त्याच्या भावाच्या वस्तीवर गेला. व पत्नी निर्मला हिला घरी चल नाहीतर पाहून घेईल, असे बोलला.

अखेर दोघा पती-पत्नीत परत वाद होणार नाहीत, अशा शब्दावर मयत निर्मला ही आपल्या नाऊर येथील राहत्या घरी परतली. मात्र त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा बाचाबाची होऊन आरोपी शांताराम यांनेपत्नी निर्मला हिला बाजेला साखळ्यानी बांधले. अगोदर त्याने पायावर व नंतर डोक्यात धारदार शस्त्राने मारून त्या जखमेवर मीठ टाकले. त्यांतर अतिशय क्रूरपणे हत्या केली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांच्यासह पोलिस निरीक्षक श्री. चौधरी, पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे, पोलीस उपनिरीक्षक श्री. निकम, हेड कॉन्स्टेबल मुंडले, पोलिस नाईक रन्नवरे आदीसह मोठा पोलिस फौजफाटा उपस्थित होता. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Web Title: Husband brutally murder his wife

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here