Home क्राईम तरुणीला गुंगीचं औषध देऊन बलात्कार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत उकळले 16...

तरुणीला गुंगीचं औषध देऊन बलात्कार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत उकळले 16 लाख

Pune Crime:  तरुणीला सॉफ्ट ड्रिंकमधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार (Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार.

Rape of young woman by giving gungi drug 16 lakhs by threatening

पुणे: पुस्तक खरेदी करण्यासाठी पुण्यात आलेल्या तरुणीला सॉफ्ट ड्रिंकमधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच त्या मुलीला विवस्त्र करुन तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 16 लाख 86 हजार रुपये उकळल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी 27 वर्षीय तरुणीने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तरुणास अटक केली आहे.  

फहीम नईम सय्यद वय २२ रा. पिंपरी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 27 वर्षाच्या तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. बालगंधर्व रंगमंदिरसमोरील विजय लॉज येथे 2 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार ते 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत तसेच 5 नोव्हेंबर 2022 ते 19 जानेवारी 2023 दरम्यान हा प्रकार घडला आहे.

तरुणी ही सांगलीतील आहे. पुस्तक घेण्यासाठी ती पुण्यात येत होती. त्यादरम्यान बसमध्ये तिची आणि फहीम सय्यद याच्याशी ओळख झाली. त्याने आपली ट्रॅव्हल एजन्सी असल्याचे सांगितले. त्यांनी एकमेकांना मोबाईल नंबर दिले. त्यावरुन त्यांच्यात संभाषण होऊ लागले. काही महिन्यांपूर्वी पुण्यात येत असताना त्याने तिला फोन केला. दोघांनी मिळून पुस्तकाची खरेदी केली आणि त्यानंतर जेवणाच्या बहाण्याने तिला बालगंधर्व चौकातील एका हॉटेलमध्ये नेले. त्यानंतर तिला सॉफ्ट ड्रिंकमधून गुंगीचे औषध देऊन तिला लॉजवर नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. तिचे विवस्त्र अवस्थेतील व्हिडीओ काढले. त्याने तिला अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तिला बदनामी करणार असं सांगून अनेकदा धमकावण्याचा प्रयत्न केला आणि तिच्याकडे पैशाची मागणी केली. आपली बदनामी होऊ नये, म्हणून या तरुणी कर्ज काढून त्याला महिन्याभरात 16 लाख 86 हजार रुपये दिले. तरीही त्यांची मागणी थांबत नसल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. पोलिसांनी फहीम सय्यद याला अटक केली.

Web Title: Rape of young woman by giving gungi drug 16 lakhs by threatening

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here