Home अहमदनगर अहमदनगर: बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर २० ते २५ जणांकडून प्राणघातक हल्ला

अहमदनगर: बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर २० ते २५ जणांकडून प्राणघातक हल्ला

Ahmednagar Crime:  बजरंग दलाचे शहर संयोजक कुणाल भंडारी व त्यांचा मित्र हे दोघे तारकपूर येथून रामवाडी कडे जात असताना वीस ते पंचवीस जणांनी त्यांच्यावर हल्ला करत मारहाण केल्याची घटना.

Ahmednagar Crime Bajrang Dal workers were attacked by 20 to 25 people

अहमदनगर : बजरंग दलाचे शहर संयोजक कुणाल भंडारी व त्यांचा मित्र हे दोघे तारकपूर येथून रामवाडी कडे जात असताना वीस ते पंचवीस जणांनी त्यांच्यावर हल्ला करत मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री साडेदहा ते साडे अकराच्या वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्यासह मोठा फौज फाटा रामवाडीत दाखल झाला.

रामवाडी येथील दोन गटात हाणामारी सुरू होती. त्यावेळी कुणाल भंडारी व दापसे हे दोघे तेथून जात असताना गर्दी कशामुळे जमली हे पाहण्यासाठी ते दोघे थांबले होते. दरम्यान त्या जमावातील काहींनी भंडारी यांच्याकडे येत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने खिशातील चौपर काढून कुणाल भंडारी याच्या पोटात खूपसण्याचा प्रयत्न केला. त्यास भंडारी याने प्रतिकार केला. त्यात भंडारी हे जखमी झाले असून, त्याच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान भंडारी येणे दिलेल्या जबाब आवरून कोतवाली पोलीस ठाण्यात 20 ते 25 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामवाडी येथे दोन मुलांच्या वादातून दोन गटांत हाणामारी झाली असल्याने हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Web Title: Ahmednagar Crime Bajrang Dal workers were attacked by 20 to 25 people

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here