Home क्राईम अनैतिक संबंधांबाबत जाब विचारणाऱ्या भाजपच्या माजी नगरसेविकाला पतीची मारहाण

अनैतिक संबंधांबाबत जाब विचारणाऱ्या भाजपच्या माजी नगरसेविकाला पतीची मारहाण

Crime News: अनैतिक संबंधांबाबत जाब विचारणाऱ्या भाईंदर पूर्वेतील भाजपच्या माजी नगरसेविका मेघना रावल यांना मारहाण, शिवीगाळ करून भाजपचा कार्यकर्ता असलेला पती दीपक रावल याने कोंडून ठेवल्याचा प्रकार.

Former BJP corporator meghana rawal beaten

मीरा रोड : अनैतिक संबंधांबाबत जाब विचारणाऱ्या भाईंदर पूर्वेतील भाजपच्या माजी नगरसेविका मेघना रावल यांना मारहाण, शिवीगाळ करून भाजपचा कार्यकर्ता असलेला पती दीपक रावल याने कोंडून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  मेघना यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी पोलिसांनी दीपक याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मेघना या नगरसेविका असताना २०२० मध्ये पती दीपक यांचे एका तरुणीशी फोनवर सतत बोलणे सुरू असल्याचे त्यांना आढळले. त्यामुळे त्यांनी दीपक यांचा मोबाइल तपासला असता, त्यात तरुणीचे अश्लील फोटो दिसले. त्याबाबत त्यांनी जाब विचारताच दीपक यांनी त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. हा प्रकार सतत सुरू होता. मेघना यांना पती कोणत्याही कार्यक्रमासाठी जाऊ देत नव्हता व दमदाटी करत होता. २३ फेब्रुवारीला रात्री १० वाजेच्या सुमारास दीपक घरी आले व त्यांनी मेघना यांच्याकडे मिसळ बनवून मागितली.

घरात त्यासाठी लागणारे फरसाण-चिवडा नसल्याने मेघना यांनी शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या नणंद शैला रावल यांना फोन करून त्यांच्याकडे या साहित्याची मागणी केली. त्याचा राग आल्याने दीपक यांनी मेघना यांना मारहाण करून स्वयंपाकघरात कोंडून ठेवले. काही वेळाने शैला या घरी आल्या आणि त्यांनी मेघना यांची सुटका केली. त्यानंतर २४ फेब्रुवारीला पतीविरोधात शिवीगाळ, मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याची तक्रार मेघना यांनी नवघर पोलिसांत दिली. त्यावरून दीपक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Former BJP corporator Meghana Rawal beaten by husband Harassment by questioning about immoral relations

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here