Home अहमदनगर मनसे स्टाइलने आंदोलन: रस्त्यालाच खासदार डॉ. सुजय विखे यांचे नाव दिले

मनसे स्टाइलने आंदोलन: रस्त्यालाच खासदार डॉ. सुजय विखे यांचे नाव दिले

Ahmednagar Rastach MP Dr. Named after Sujay Vikhe

अहमदनगर | Ahmednagar: मनसेच्या वतीने सातत्याने मागणी करूनही नगरमधील काटवन खंडोबा रोड दुरुस्त होत नसल्याने तसेच या खराब रस्त्याला खासदार विखेच जबाबदार असल्याने मनसेने आज आंदोलन केले. यावेळी या खराब रस्त्याला डॉ. सुजय विखे मार्ग असे नाव देण्यात आले. रस्त्याच्या या खराब परिस्थितीला खासदार विखे जबाबदार असल्याने त्यांचे नाव देण्यात आले असे मनसेने स्पष्ट केले आहे.

हे आंदोलन मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, सचिन नितीन भूतारे, मनोज राउत आदी कार्यकर्ते यांनी केले.  

मागील दोन वर्षापासून या रस्त्याला निधी देणार, असे पत्र खासदार विखे यांनी महापालिका आयुक्तांकडे दिले. मात्र आज अखेर विखे यांनी कोणताही निधी या रोडला दिला नाही. उलट दलितवस्ती निधीतून हा रोड दुरुस्ती होणार होता. त्या कामाची मंजुरी ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी देण्यात आली होती. परंतु स्थानिक शिवसेना नगरसेवकांनी हे काम उपायुक्तांवर दबाव आणुन ९ सप्टेंबर २०१९ रोजी पत्र देऊन बंद पाडले. दुसरीकडे खासदार या रोड ला निधी देणार होते, परंतु न मिळाल्याने रस्त्याचे काम झाले नाही.

या खराब रस्त्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे मनसेने आक्रमक पवित्रा घेत या रस्त्याला खा. डॉ. सुजय विखे नाव देवून आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Ahmednagar Rastach MP Dr. Named after Sujay Vikhe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here