Home अकोले संगमनेर तहसील कार्यालयासमोर मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन

संगमनेर तहसील कार्यालयासमोर मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन

Sangamner tehsil office for various demands of Maratha community

संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरात आज तहसील कार्यालयासमोर ताशा वाजवून ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चात तरुणाने सहभाग घेत ठिय्या आंदोलन केले. यावेळी जोरदार आवाजात घोषणाबाजी करण्यात आली.

राज्यसरकारने लवकरात लवकर पावले उचलत मराठा समाजाच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तालुक्यातील विविध स्थरातील मराठा समाज उपस्थित होता. ताशा, वाद्य, घोषणा याने तहसील कार्यालय परिसर दुमदुमून गेला होता. सुमारे दीड तास हे आंदोलन सुरु होते.

यावेळी मराठा समाजातील नेत्यांनी भावना व्यक्त केल्या. मागण्या जर मान्य नाही झाल्यास अधिक तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलन कार्यकार्यकर्त्यांनी दिला, आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात अन्यथा राज्यात आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही. मराठा समाज पेटून उठल्यास यास पूर्णतः केंद व राज्य सरकार जबाबदार राहील अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.

या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित होता. मराठा समाजाच्या वतीने तरुणानी नायब तहसीलदार कदम यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सुपूर्द करण्यात आले.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Sangamner tehsil office for various demands of Maratha community

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here