Home संगमनेर संगमनेर: विज दुरुस्तीचे काम सुरू असताना विजेचा रिटर्न सप्लाय आला अन….

संगमनेर: विज दुरुस्तीचे काम सुरू असताना विजेचा रिटर्न सप्लाय आला अन….

Breaking News | Sangamner: विज दुरुस्तीचे काम सुरू असताना विजेचा रिटर्न सप्लाय आल्याने कंत्राटी कामगाराला विजेचा शॉक बसून त्यात तो भाजल्याची घटना.

Return supply of electricity came while the electricity repair work 

संगमनेर : घारगाव येथील महावितरणच्या सबस्टेशनमध्ये विज दुरुस्तीचे काम सुरू असताना विजेचा रिटर्न सप्लाय आल्याने कंत्राटी कामगाराला विजेचा शॉक बसून त्यात तो भाजल्याची घटना रविवार ९ जून रोजी सकाळी घडली आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून हा कंत्राटी कामगार या घटनेतून केवल जीवाने बचावला आहे.

घारगाव येथील महावितरण कंपनीच्या सबस्टेशनमध्ये अक्षय वाळू कापसे ही व्यक्ती कंत्राटी कामगार म्हणून काम करत आहे. शनिवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला होता. यात सबस्टेशनमधील एका फीडरची विजेची तार तुटली होती. ती दुरुस्ती करण्याचे काम कापसे करत होते. परंतु काम सुरू असताना अचानक रिटर्न सप्लाय आला. तेथे उपस्थित असलेल्या त्यांच्या सहकाऱ्याने प्रसंगावधान साधत कापसे यांची सुटका केली. मात्र यात कापसे मोठ्या प्रमाणात भाजले गेले असल्याने त्यांना तातडीने खाजगी रुग्णवाहिकेतून संगमनेर येथे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.

या दरम्यान घारगाव सबस्टेशनच्या अधिकाऱ्यांचा भोंगळ व मनमानी कारभार सुरू असल्याचे समोर आले आहे. येथे कर्तव्यावर रुजू असलेल्या सहाय्यक अभियंत्यांचे महावितरणचे कामावर पूर्णतः दुर्लक्ष असल्याच्या तक्रारी यावेळी कानावर येत होत्या.

Web Title: Return supply of electricity came while the electricity repair work 

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here