Home संगमनेर आ. बाळासाहेब थोरात रुग्णालयात

आ. बाळासाहेब थोरात रुग्णालयात

Breaking News | Sangamner: आमदार बाळासाहेब थोरात यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल.

come Balasaheb Thorat Hospital

संगमनेर: लोकसभा निवडणुकीत प्रचाराची जबाबदारी समर्थपणे सांभाळत काँग्रेसला नवसंजीवनी देणारे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून आ. थोरातांच्या तब्येतीची चौकशी केली. ‘लवकरात लवकर बरे व्हा व तब्बेतची काळजी घ्या. आराम करा’ असा सल्ला त्यांनी थोरात यांना दिला. लोकसभा निवडणुकीत प्रचाराची जबाबदारी पार पाडताना मोठ्या प्रमाणावर धावपळ झाली. गेली दोन महिने राज्यभर गावोगावी फिरून काँग्रेससह आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करून मोठे यश मिळाले. दगदग व थकव्यामुळे निवडणूक काळात पुरेशी विश्रांती न मिळाल्याने आ. थोरातांची प्रकृती बिघडली होती. यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात आले.

थोरात यांची प्रकृती आता उत्तम असून रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर थेट संगमनेरला परतणार आहेत. कार्यकर्त्यांनी मुंबईला भेटीसाठी येऊ नये, असे आवाहन थोरात यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

Web Title: come Balasaheb Thorat Hospital

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here