Home अहमदनगर हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही : शरद पवार

हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही : शरद पवार

Breaking News | Ahmednagar: पंतप्रधानपदावर बसलेल्या नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत या पदाला न शोभणारी भाषणे केली, अहमदनगरला राष्ट्रवादीचा रौप्य महोत्सव साजरा.

This wandering soul will not leave you Sharad Pawar

अहमदनगर : पंतप्रधानपदावर बसलेल्या नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत या पदाला न शोभणारी भाषणे केली. मला ते भटकता आत्मा म्हणाले. आत्मा सतत जिवंत राहतो असे मोदी मानत असतील तर हा आत्मा त्यांना सोडणार नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेच्या रौप्य महोत्सवानिमित्त पक्षाचा जाहीर मेळावा येथे पवारांच्या उपस्थितीत झाला. मेळाव्याला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, तसेच सुप्रिया सुळेंसह पक्षाचे आठही नवनिर्वाचित खासदार, विजयसिंह मोहिते पाटील, शेकापचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, फौजिया खानः आदींची प्रमुख उपस्थिती होती. पवार म्हणाले, मोदींनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. मात्र, त्यांच्याकडे बहुमत नाही. ते भाषणात ‘मोदी गॅरंटी’ व ‘मोदी सरकार’ हे उल्लेख करत होते. आज ती गॅरंटी व सरकार संपलेले आहे. हे एनडीए सरकार आहे असे मोदींना आज बोलावे लागत आहे. माझ्यावर ते बोललेच, पण शिवसेनेला नकली बापाची संघटना म्हणाले. माणूस बेफाम होतो तेव्हाच तो असे बोलतो. त्यामुळे जनतेने योग्य भूमिका बजावली. महाराष्ट्रासह तीन राज्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांना ताकदीने सामोरे जाऊ, असेही ते म्हणाले.

राम राजकारणासाठी वापरणार नाही

राम मंदिराचा प्रश्न निवडणुकीत महत्त्वाचा राहील असे लोकांना वाटत होते. पण तसे झाले नाही. मी अयोध्येला जाईन. पण, रामाचा वापर कधी राजकारणासाठी करणार नाही. भाजपने त्याचे राजकारण केले, अशी टीकाही पवार यांनी केली.

आठ खासदार हे आमचे अष्टप्रधान मंडळ

सभेला खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, नीलेश लंके, बजरंग सोनवणे, भास्कर भगरे, अमर काळे, धैर्यशील मोहिते, सुरेश म्हात्रे यांची उपस्थिती होती. आमचे हे आठही खासदार म्हणजे शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ आहे. ते लोकांचे हित जपतील, असे शरद पवार म्हणाले.

वाढदिवसानिमित्त ८५ आमदारांची

भेट : सभेत बोलताना रोहित पवार म्हणाले, पक्षाने रौप्यमहोत्सव साजरा केला आहे. तसेच शरद पवार यांच्या वयाला ८५ वर्षे पूर्ण होत आहे. त्यामुळे ८५ आमदार निवडून आणून पवारांना भेट द्यायची आहे.

Web Title: This wandering soul will not leave you Sharad Pawar

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here