Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील या भागांत पेरणीलायक पाउस

अहमदनगर जिल्ह्यातील या भागांत पेरणीलायक पाउस

Breaking News | Ahmednagar: मान्सूनपूर्व आणि मान्सून दाखल झाल्यानंतर अनेक तालुक्यांत दमदार पावसाची नोंद.

Sowingable rains in these parts of Ahmednagar 

अहमदनगर: जिल्ह्यात मान्सूनपूर्व आणि मान्सून दाखल झाल्यानंतर अनेक तालुक्यांत दमदार पावसाची नोंद झाली आहे. विशेष करून जिल्ह्याच्या दक्षिण भागात अनेक ठिकाणी मोठा पाऊस झालेला असून उत्तर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, संगमनेर आणि अकोले तालुक्याच्या काही भागात पेरणीसाठी अजून पावसाची गरज असून पुरेसा अथवा 100 मि.मी. पेक्षा जादा पाऊस झाल्यानंतर पेरणी करण्यात यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. तर पारनेर, श्रीगोंदा, नेवासा, राहुरी, कर्जत, जामखेड, पाथर्डी तालुक्यांत पेरणीलायक पाऊस झाला असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, रविववारी जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद पाथर्डी तालुक्यातील करंजी आणि श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव महसूल मंडलात 112 मि.मी. झाली आहे. तर पारनेर मंडलात 105 मि.मी., वाडेगव्हाण 107 मि.मी., कोरडगाव 110 मि.मी., सलाबतपूर 100 मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. यंदा नगर जिल्ह्यात बर्‍याच वर्षांनंतर पावसाने दमदार सुरूवात केली आहे. यामुळे अनेक ठिकाणी खरिपाच्या पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. यंदा हवामान खात्याने चांगला पाऊस जाहीर केल्यानंतर शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाने दमदार सुरुवात केली आहे. जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस दाखल झाला असून मान्सूनपूर्व पावसाने देखील दमदार हजेरी लावली आहे.

विशेष करून जिल्ह्याच्या दक्षिण भागात शुक्रवार, शनिवार आणि रविवारी चांगला पाऊस झाला आहे. रविवारी झालेल्या पावसाच्या नोंदीमध्ये नगर तालुक्यात नालेगाव 34, सावेडी 26, कापूरवाडी 29, केडगाव 44, भिंगार 64, नागापूर 41, जेऊर 50, रुईछत्तीशी 35, चास 39.5 आणि वाळकी 29.8. पारनेर 105, भाळवणी 42, सुपा 81, वाडेगव्हाण 107.3, निघोज 24.8, टाकळी 47.5, पळशी 35.5. श्रीगोंदा 26, काष्टी 30.8, मांडवगण 54.3, बेलवंडी 66.5, पेडगाव 22, चिंभळा 62, देवदैठण 72, कोळगाव 112, कर्जत 55, राशीन 88, भांबोरा 30, कोंभळी 33, मिरजगाव 42, माहिजळगाव 51, जामखेड 28, आरणगाव 39.8, नायगाव 24.5, शेवगाव 74, भातकुडगाव 44.5, चापडगाव 48.3, ढोरजळगाव 69, पाथर्डी 66.5, माणिकदौंडी 43.3, टाकळी 65, कोरडगाव 110.8, करंजी 112.8, नेवासा बु. 46, सलाबतपूर 100, कुकाणा 40.3, चांदा 23, घोडेगाव 47.8, सोनई 58, वडाळा 73. सात्रळ 48.8, ताराबाद 41.3, देवळाली 46.5, टाकळीमिया 35, ब्राम्हणी 27, वांबोरी 37.8, साकूर 21.8, समशेरपूर 32, सुरेगाव 33, दहिगाव 39.3, श्रीरामपूर 48, बेलापूर 68, उंदिरगाव 40, टाकळीभान 26, राहाता 20.3, शिर्डी 30, लोणी 62 मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे.

जून महिन्यांत जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील राशीन महसूल मंडळात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. याठिकाणी आतापर्यंत 249.2, भांबोरा 230 आणि करंजी (पाथर्डी) याठिकाणी 210 मि.मी. पाऊस झालेला आहे. तर ब्राम्हणवाडा (अकोला) याठिकाणी अवघा 19.7 पावसाची नोंद झालेली आहे. राशीन, भांबोरा आणि करंजी मंडळाने जून महिन्यांतील पावसाची सरासरी ओलांडली आहे. जून महिन्यातच धडकेदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Web Title: Sowingable rains in these parts of Ahmednagar 

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here