Home पुणे विवाहित महिलेवर बलात्कार; पैसे आणि दागिनेही घेतले

विवाहित महिलेवर बलात्कार; पैसे आणि दागिनेही घेतले

Breaking News | Pune Rape Case: लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर वारंवार बलात्‍कार करुन तिच्याकडून वेळोवेळी पैसे आणि सोन्‍याचे दागिने घेतल्याचा प्रकार.

Rape of a married woman

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर वारंवार बलात्‍कार करुन तिच्याकडून वेळोवेळी पैसे आणि सोन्‍याचे दागिने घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच लग्नास नकार देत या महिलेला संबंध ठेवताना काढलेले फोटो पतीला पाठवण्याची धमकीही दिली. हा प्रकार ऑगस्ट 2023 ते 28 फेब्रुवारी 2024 या कालावधीत कोंढवा, गुजरात आणि राजस्थान येथे घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 21 वर्षीय विवाहित महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार समीर युसुफ (वय-35 रा. अशोका म्युज, कोंढवा खुर्द, पुणे) याच्यावर आयपीसी 376/2/एन, 406, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत महिलेची आणि आरोपीची 2023 मध्ये ओळख झाली. आरोपीने महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवले. पिडीतेला घरी बोलवून तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच महिलेला गुजरात आणि राजस्थान येथे नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

त्यानंतर महिलेला वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून ऑनलाइन 2 लाख 33 हजार 995 रुपये घेतले. त्यापैकी 59 हजार 220 रुपये परत करुन उर्वरीत 1 लाख 74 हजार 775 रुपये देण्यास टाळाटाळ केली. तसेच महिलेचे 50 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसुत्र व 20 हजार रुपयांची चार ग्रॅमची अंगठी घेतली.महिलेने पैसे आणि सोन्याचे अंगठी परत मागितली असता त्याने देण्यास टाळाटाळ केली.फिर्यादी यांनी पैसे आणि दागिन्यासाठी तगादा लवला असता शारीरिक संबंध ठेवताना काढलेले फोटो पतीला पाठवण्याची धमकी दिली. आरोपीने लग्न न करता तसेच घेतलेले पैसे व दागिने परत न करता फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

Web Title: Rape of a married woman

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here