Home संगमनेर संगमनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, गुन्हा दाखल

संगमनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, गुन्हा दाखल

Breaking News | Sangamner Crime: अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना.

One person died in a collision with an unknown vehicle, a Crime has been registered

संगमनेर : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना दि.१५ एप्रिल रोजी सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास शहरातील देना बँकेसमोर घडली. अपघातातील जखमीने रविवारी फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 याबाबत समजलेली माहिती अशी की, शशिकांत भानुदास शिंदे (रा. ढोलेवाडी) व चिमा लक्ष्मण पवार (वय ७४, रा. संजय गांधी नगर, संगमनेर) हे आपल्या दुचाकीवरून (क्रमांक एमएच १७ डीए १६२८) नाशिक-पुणे महामार्गावरून जात होते. (दि.१५) एप्रिल रोजी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास या दुचाकीला अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली. या अपघातामध्ये दोघे जखमी झाले. जखमी पवार यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. अपघातानंतर वाहन चालक फरार झाला. अपघातात जखमी झालेल्या चिमा लक्ष्मण पवार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातामध्ये जखमी असलेल्या शशिकांत भानुदास शिंदे (रा. ढोलेवाडी) यांनी रविवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: One person died in a collision with an unknown vehicle, a Crime has been registered

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here