Home महाराष्ट्र बहिण भावाच्या नात्याला काळिमा: सख्ख्या भावाने केले बहिणीचे लैंगिक शोषण

बहिण भावाच्या नात्याला काळिमा: सख्ख्या भावाने केले बहिणीचे लैंगिक शोषण

Vardha News: रक्षण करणाऱ्या भावानेच दुष्कृत्य केलं, बहिणीचे लैंगिक शोषण (sexually abused) मुलगी सहा महिन्याची गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघड.

Sakhkhya's brother sexually abused his sister

वर्धा: बहिण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना वर्ध्यात घडली आहे. रक्षण करणाऱ्या भावानेच दुष्कृत्य केलं आहे. सख्ख्या भावानेच बहिणीच लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगी सहा महिन्याची गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. या धक्कादायक घटनेचा निषेध व्यक्त होत आहे. पिडीतेच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शहर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  आई-वडिल कामानिमित्त घराबाहेर गेले असताना एका नराधम भावाने घरात असलेल्या बहिणीचे लैंगिक शोषण केले. बहिण-भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासण्याचं कृत्य नराधम भावाने केले आहे. पीडित मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यावेळी ती गर्भवती असल्याचे उघड झाले. या घटना पीडितेच्या कुटुंबीयांना समजताच त्यांना मानसिक धक्का बसला. पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासकांनी पीडित मुलीचे समुपदेशन केले आहे. त्यानंतर घडलेला सर्व प्रकार पीडितेने पोलिसांना सांगितला. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Web Title: Sakhkhya’s brother sexually abused his sister

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here