Home अहमदनगर Accident | अहमदनगर महामार्गावर ट्रक पलटी, दोन तरुणांचा मृत्यू

Accident | अहमदनगर महामार्गावर ट्रक पलटी, दोन तरुणांचा मृत्यू

Beed Accident: सामान घेऊन जाणारी ट्रक वळणावर पलटी, दोन तरुणांचा मृत्यू.

Truck overturns on Ahmednagar highway Accident two youths die 

बीड: बीड अहमदनगर महामार्गावर महेंद्रवाडी घाटात सामान घेऊन जाणारी ट्रक वळणावर पलटी झाल्याची घटना रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.

निखील दहिफळे (वय 18) नानासाहेब सानप (वय 21) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत.

निखील आणि नानासाहेब हे दोघेही तरुण खडकवाडी ता. पाटोदा गावातील रहिवाशी होते. या घटनेने खडकवाडी गावात शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बीडच्या पाटोदा पोलिस ठाणे हद्दीत दौंडकडून येणारा ट्रक महेंन्द्रवाडीच्या घाटात आला असता, ट्रक चालकाला कॉर्नरचा अंदाज न आल्यामुळे, ट्रकवरील नियंत्रण सुटले.

त्यानंतर ट्रक बाजूच्या दरीमध्ये कोसळला. या भीषण अपघातात ट्रक मधील निखील दहिफळे व नानासाहेब सानप यांचा जागीच मृत्यू झाला . दरम्यान हे मयत झालेले दोन्ही युवक अविवाहीत होते, या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Web Title:Truck overturns on Ahmednagar highway Accident two youths die 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here