Home अहमदनगर अहमदनगर: मतीमंद युवतीवर अत्याचार, चुलताच निघाला नराधम

अहमदनगर: मतीमंद युवतीवर अत्याचार, चुलताच निघाला नराधम

Pathardi Crime News: गर्भवती असल्याने तसेच रक्ताच्या नमुने तपासणीत नराधम आरोपी आला समोर (Sexually abused).

Mental retarded girl was Sexually abused the cousin turned out

पाथर्डी: मुकबधीर व मतीमंद युवतीवर अत्याचार करणारा नराधम तिचा चूलताच निघाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी अथक प्रयत्नांनी आरोपीचा शोध लावला आहे.

साहेबराव लक्ष्मण शिंदे (72) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. तालुक्यातील एका गावात मतींमंद व मुकबधीर युवतीचे पोट दुखु लागल्याने तिला कुटुंबियांनी दवाखान्यात नेले. तेथे ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

यावरून 2 मार्च 2022 रोजी युवतीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली होती. मुलगी मतीमंद असल्याने तीला काहीच बोलता अथवा काही सांगता येत नव्हते. यामुळे या घटनेचा तपास करणे पोलिसासमोर कडवे आव्हान होते. पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायय्क पोलिस निरीक्षक प्रविण पाटील, सागर मोहीते यांनी या प्रकरणाचा तपास केला. पिडीत मुलीला बोलता येत नव्हते. ऐकु येत नव्हते व ती मतीमंदही होती. पोलिसांनी मुकबधीर विद्यार्थ्यांचे शिक्षक घेवुन तपास केला.

सुमारे वीस लोकांचे रक्ताचे नमुणे घेवुन नाशिक येथील न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत तापसणीसाठी पाठविले. संशयित शिंदे याचे नमुने घेतल्यापासुन त्याचे वागने संशयास्पद असल्याचे पोलिसांना जाणवले होते. त्याच्यावर लक्ष ठेवले गेले.

अखेर रविवारी नाशिकच्या प्रयोगशाळेचा अहवाल पोलिसांना मिळाला. त्यामधे साहेबराव शिंदे हाच मुलीला गर्भवती करणारा संशयित असल्याचे उघड झाले. पोलिसांनी शिंदे याला तात्काळ अटक केली. सोमवारी शिंदे याला न्यायाधीश व्ही.आय.शेख यांच्यासमोर हजर केले. त्याला पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश शेख यांनी दिले आहेत.

Web Title: Mental retarded girl was Sexually abused the cousin turned out

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here