Home अहमदनगर गुंजाळवाडी शिवारात ऊस तोड मजुरांच्या ट्रॅक्टरला अपघात

गुंजाळवाडी शिवारात ऊस तोड मजुरांच्या ट्रॅक्टरला अपघात

Sangamner Accident News Gunalwadi area tractor

संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे बाह्यवळण गुंजाळवाडी शिवारात बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला एका कारने हुलकावणी दिल्याने ट्रोली उलटून अपघात घडला.

या अपघातात १४ जण जखमी झाले आहेत. जखमींना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ऊसतोड आटोपून ऊस साखर कारखान्यात घेऊन जात असताना अपघात घडला. ऊस तोड मजूर हे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील रहिवासी आहेत.

या अपघात जखमींमध्ये ऊस तोड कामगार, महिला व लहान मुलांचा समावेश आहे. एकूण १४ जण जखमी झाले आहेत. संगमनेर शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Sangamner Accident News Gunalwadi area tractor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here