Home अहमदनगर संगमनेर शहरात व्हाटस मेसेजवरून दोन गटांत हाणामारी

संगमनेर शहरात व्हाटस मेसेजवरून दोन गटांत हाणामारी

Two groups clash over WhatsApp message in Sangamner

संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरात दोन गटांत तुफान हाणामारी घडली आहे. दोनही गटांतील कार्यकर्त्यांनी एकमेंकास चोपले आहे. या हाणामारीचे प्रमुख कारण म्हणजे व्हाटस वर आर्क्षेपाह्र्य मेसेज पाठवून समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

यात दोन्ही गटांनी प्राणघातक शस्त्रांचा वापर करीत हाणामारी केली. याप्रकरणी शहर पोलिसांनी दोनही बाजूंच्या प्रत्येकी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री संशियीत आरोपी अमित रहातेकर, धिरज रहातेकर रा. इंदिरानगर, सुरज गाडे व इतर दोन जण या पाच जणांनी योगेश सोमनाथ पोगुल याने त्याच्या मोबाईलवरून समाज माध्यमात वादग्रस्त स्टेटस ठेवल्याने त्याचा जाब विचारीत यामधील आरोपी नंबर एकाने हातातील दांड्याने फिर्यादीच्या डोक्यावर व चेहऱ्यावर घाव घालत त्याला जखमी केले आहे. यामध्ये सोडविण्यासाठी आलेल्या इतर लोकांनाही लाथाबुक्यांनी मारहाण व शिवीगाळ करण्यात आली. शहरातील कुटे रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत.

तर अमित सुरेश रहातेकर याने दिलेल्या फिर्यादीत समाज माध्यमातील स्टेटस ठेवलेल्या मजकुरावरून संशियत आरोपी योगेश पोगुल, कल्पेश पोगुल, सोनू गोफणे, पोगुल याची आई व पत्नी यांनी लाकडी दांडक्याने डोक्यावर व तोंडावर प्रहार करीत लाथाबुक्यांनी मारहाण, दमदाटी व शिवीगाळ केली असे फिर्यादीत नमूद केले आहे. यातील जखमींवर तांबे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दोनही गटांच्या तक्रारीवरून दोनही बाजूंच्या प्रत्येकी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Two groups clash over WhatsApp message in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here