निळवंडे कालव्याच्या खड्यात बुडून चिमुरड्याचा मृत्यू, संगमनेर तालुक्यातील घटना
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथे २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली आहे. खेळता खेळता कालव्यासाठी खोदलेल्या खड्यात पडून चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मालुंजे येथील घुगे वस्तीवरील युवराज बबन घुगे वय ४ वर्ष हा मंगळवारी २० ऑक्टोबर रोजी वस्तीलगत असलेल्या निळवंडे कालव्यासाठी खोदलेल्या खड्यात खेळता खेळता पडला. पाण्याने भरलेल्या या खड्यात पडल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला.
निळवंडे कालव्यासाठी अनेक खड्डे खोदून अपूर्ण अवस्थेत ठेवल्यामुळे चिमुकल्याचा बळी गेला आहे. या अर्धवट कामांमुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. या दुर्दैवी घटनेने स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी ठेकेदाराने उपाययोजना करण्याचे गरजेचे आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Child dies after drowning in Nilwande canal