Home अहमदनगर संगमनेर: मित्राच्या मदतीने मुलानेच टाकला स्वतःच्या घरावर दरोडा

संगमनेर: मित्राच्या मदतीने मुलानेच टाकला स्वतःच्या घरावर दरोडा

Sangamner help of friend the boy robbed his own house

संगमनेर: शहरातील मालदाड रोड येथील एमएसईबी कॉलनीत राहणाऱ्या मुलाने त्याच्या मित्राच्या सहायाने स्वतःच्या घरात दरोडा टाकण्याची घटना मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून शर पोलिसांनी मुलगा व त्याचा मित्र व त्याची पत्नी अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील मालदाड रोड येथील एमएसईबी कॉलनीत फिर्यादी सौ. मंगल संजय डमरे या आपल्या परिवारासमवेत राहतात. त्यांचा मुलगा अतिश व त्यांच्यात नेहमीच वाद होत असत. फिर्यादी या आपले घर बंद करून बाहेर गेलेल्या होत्या. या संधीचा फायदा घेऊन मुलगा अतिश डमरे त्याचा मित्र सुरज वाघ, त्याची पत्नी निकिता वाघ यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातील कपाटात असलेले १ लाख २० हजार रुपये किमतीचे मिनी गंठन, ८७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे कानातील साडे तीन तोळे वजनाचे झुबे, ७५ हजार रुपयांची अडीच तोळ्याची सोन्याची चैन, २५ हजार रुपयाची मोटारसायकल व इतर किमती साहित्य असे एकूण ३ लाख १२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. यातील आरोपींनी चोरलेले सोन्याचे दागिने नाशिक येथील एका सोनाराला विकले आहे असे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी संगमनेर पोलीस अधिक तपास करीत आहेत.   

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Sangamner help of a friend the boy robbed his own house

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here