Home अकोले Akole: अकोले तालुक्यात आज आढळले इतके रुग्ण

Akole: अकोले तालुक्यात आज आढळले इतके रुग्ण

Akole Taluka Today Seven Corona infected

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज प्राप्त झालेल्या अहवालात सात करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या २१३४ वर पोहोचली आहे. तालुक्याची बाधितांची संख्या आज कमी झाली आहे.  

आज गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात माळीझाप येथील २१ व ३१ वर्षीय पुरुष बाधित आढळून आले आहेत. चितळवेढे येथे ५० वर्षीय पुरुष तर ४० वर्षीय महिला बाधित आढळून आले आहेत. अकोले कारखाना रोड येथे ४६ वर्षीय पुरुष, १८ वर्षीय तरुण , तिरडे येथील ६८ वर्षीय महिला असे आज ७ बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण संख्या २ हजार १३४ इतकी झाली आहे.

संगमनेर तालुक्यातसुद्धा बाधितांची संख्या कमी होत आहे तर अकोले तालुक्यात कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील आज बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्केच्या अधिक झाले आहे. अकोले तालुक्यातील २६ रुग्ण आज बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Akole Taluka Today Seven Corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here