संगमनेरात नियमांचे उल्लंघन आणखी पाच दुकानांवर कारवाई
संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरात व तालुक्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग वाढला असताना प्रशासनाने सूचना देऊन देखील व्यावसायिक सूचनांचे पालन करीत नसल्याने काल संगमनेर नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी संयुक्त कारवाई केली. शहरातील एका मंगल कार्यालयासह सात दुकाने सील करण्यात आहे.
अनेक मंगल कार्यालयात लग्न व साखरपुडा कार्यक्रम धूम धडाक्यात सुरु आहेत. मास्क वापरला जात नाही. मोठ्या गर्दीत हे कार्यक्रम सुरु असल्याने कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वाटत आहे.
पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख हे स्वतः या कारवाईत सहभागी झाले होते. संगमनेर नगरपालिकेचे कर्मचारी आणि पोलीस यांनी काल सायंकाळी शहरात पाहणी केली असता अनेक दुकानात नियमांचे उल्लंघन होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे या दुकानांना सील लावण्यात आले आहे. शहरातील निमाई स्वीट, नाईस कलेक्शन, बी एम स्वीट्स, बेकरी, कॉलेज कॉर्नर जवळील हॉटेल व पार्लर या दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे.
Web Title: Sangamner Action against five more shops for violating the rules