Home अहमदनगर पाच हजाराची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकाविरोधात गुन्हा

पाच हजाराची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकाविरोधात गुन्हा

Ahmednagar News Crime against a gram sevak who demanded a bribe

अहमदनगर | Ahmednagar News: महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीच्या अनुदानासंदर्भात पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी शेतकऱ्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मांडावे येथील ग्रामसेवकासह ग्रामरोजगारसेवका विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने येथील कोतवाली पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.

ग्रामसेवक गणेश जनार्दन देहाडे व अशोक भानुदास निमसे या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यातील तक्रारदारांच्या वडिलांच्या नावे मांडवे येथे एमआरइजीएस योजनेअंतर्गत विहिरी मंजूर झाली आहे. या विहिरीचे ४२ हजार रुपयांचे अनुदान मंजुरी संदर्भात पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी ग्रामसेवक देहाडे याने पाच हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १९ जून रोजी तक्रार केली होती. त्याननंतर पथकाने त्याच दिवशी लाचेची पडताळणी केली. त्यानंतर तक्रारदाराकडून पंचासमक्ष लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली.

Web Title: Ahmednagar News Crime against a gram sevak who demanded a bribe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here