संगमनेरातील घटना: चोरटा महिला रुग्णासह अॅम्ब्युलन्स घेऊन पळाला
संगमनेर | Theft: एका महिला रुग्णाला उपचारासाठी अॅम्ब्युलन्समधून पुणे येथे घेऊन जात असताना घारगाव येथे ती थांबविली चालक, नातेवाईक खाली उतरले असता अचानक अॅम्ब्युलन्स रुग्णासह चोरटा घेऊन पळाला. पोलिसांनी काही तासांतच गुन्ह्याचा तपास लावत संगमनेर येथून रुग्णवाहिका व आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. व रुग्णाला उपचारासाठी पुण्याला पाठविण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी रात्री रुग्णवाहिका चालक योगेश म्हाळू रोंगटे रा. कवडदारा नाशिक हा एक महिला रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना घेऊन नाशिक पुणे महामार्गावरून पुण्याकडे चालले होते. रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घारगाव येथे एका हॉटेलसमोर रुग्ण वाहिका उभी करून चालक पार्सल आणण्यासाठी गेला त्याचदरम्यान रुग्णांचे नातेवाईक लघुशंकेसाठी खाली उतरले. ते सर्व जण परत आले तर रुग्णवाहिका जागेवर नव्हती. त्यावेळी चोरी लक्षात आले. त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क केला. घारगाव पोलिसांनी लगेचच हालचाली सुरु करत नाकाबंदी करून मार्गावरील पोलिसांना माहिती देण्यात आली. ‘काही वेळानंतर संगमनेर पोलिसांना ही रुग्णवाहिका शहरातून जाताना आढळली त्यांनी ती ताब्यात घेऊन घारगाव पोलिसांना माहिती दिली. घारगाव पोलीस तातडीने संगमनेरला पोहीचले. त्यांनी रुग्णवाहिका व आरोपी वैभव सुभाष पांडे यास ताब्यात घेतले, रुग्णवाहिकेतील महिला सुरक्षित होती. रुग्णवाहिका लगेच रोंगटे यांच्या ताब्यात दिली व रुग्णाला पुणे येथे रवाना केले.
त्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पांडे याच्याविरोधात रुग्ण वाहिका चोरीचा व महिला रुग्ण अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत चोरीच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. अधिक तपास घारगाव पोलीस करीत आहे.
Web Title: Sangamner Ambulance theft