Home अहमदनगर रेमडेसिवीरचा काळा बाजार: रेमडेसिवीरच्या बाटलीत सलाईनचे पाणी भरून विक्री

रेमडेसिवीरचा काळा बाजार: रेमडेसिवीरच्या बाटलीत सलाईनचे पाणी भरून विक्री

Black market of Remdesivir injection ahmednagar

श्रीरामपूर: श्रीरामपूरमध्ये रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. कोरोना रुग्णाच्या जीवाशी खेळत असलेल्या रेमडेसिवीरच्या बाटलीत सलाईनचे पाणी भरून विक्री केल्याचे उघड झाले आहे.

डॉक्टरांनी कचऱ्याच्या डब्यात फेकलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्यांत सिरीजने सलाईनमधील पाणी भरून विक्री करण्यात येत होती. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

अटक केलेल्या आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बरेचसे नातेवाईक रेमडेसिवीर मिळविण्यासाठी धडपड करीत आहेत याचाच फायदा घेत काही जण पैसे कमवीत आहे.

श्रीरामपूरमधील एका नातेवाईकाला रेमडेसिवीरच्या इंजेक्शनची गरज होती. त्याच्या नातेवाइकाळा रइस अब्दुल शेख वय २० रा. मातापूर ता. श्रीरामपूर याने संपर्क करून रेमडेसिवीर देतो असे सांगितले. चिट्ठी नसतानाही २५ हजार रुपयांना इंजेक्शन देत असल्याने नातेवाईक यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत रईस शेख याला श्रीरामपूर येथील हरेगाव फाट्याजवळील उड्डाण पुलाजवळ पकडले. त्याच्याकडून बनावट रेमडेसिवीरचे इंजेक्शन जप्त केले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर धक्कादायक कुबुली समोर आले. रेमडेसिवीरचच्या इंजेक्शन मध्ये सलाइनचे पाणी भरून विक्री करायचो असे त्याने सांगितले.

याप्रकरणी भक्ती भागवत काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर पोलीस ठाण्यात शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आणखी कोरोना रुग्णांना विकले का? यामुळे कोणाचा बळी गेला आहेत का? याचा तपास श्रीरामपूर पोलीस करीत आहे.  

Web Title: Black market of Remdesivir injection

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here