Home अकोले शिवसैनिकांच्यावतीने संगमनेर व अकोले शहरात दानवेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

शिवसैनिकांच्यावतीने संगमनेर व अकोले शहरात दानवेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

Sangamner and Akole, a shoe-throwing movement 

अहमदनगर: शेतकरी आंदोलन करीत असताना शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान व चीनचा हात असल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी केला होता.

संगमनेर शहरात नवीन नगर रोड परिसरात शिवसैनिकांनी एकत्र येत दानवेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी निषेध नोंदविला. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख जनार्दन आहेर, शहर परमुख अमर कातारी, उपशहर प्रमुख पप्पू कनकाटे, माजी नगसेवक लखन घोरपडे, आदि शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

अकोले शहरात कोल्हार घोटी महामार्गावर शिवसैनिकांच्या वतीने फोटो वर जोडे मारत आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी दानवे व भाजपचा निषेध नोंदविला. यावेळी विरोधात घोषणा करण्यात आल्या. यावेळी शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख रामहरी तिकांडे, अकोले तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले, प्रदीप हासे, मिलिंद रुपवते, नितीन नाईकवाडी आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.  

Web Title: Sangamner and Akole, a shoe-throwing movement 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here