Home Accident News संगमनेर तालुक्यात नाशिक पुणे महामार्गावर तीन वाहनांचा अपघात

संगमनेर तालुक्यात नाशिक पुणे महामार्गावर तीन वाहनांचा अपघात

Accident of three vehicles on Nashik-Pune highway

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात नाशिक पुणे महामार्गावर आंबी खालसा फाटा येथे तीन वाहनांचा अपघात (Accident) घडला. हा अपघात काल शुक्रवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

शुक्रवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या दरम्यान नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोचा ब्रेक न लागल्याने दोन कारला पाठीमागून जाऊन धडक दिली. या धडकेत आयशर टेम्पो कंट्रोल करीत असताना टेम्पो महामार्गाच्या दुभाजकावर जाऊन आदळला. या अपघातात दोनही कारचे मोठे नुकसान झाले आहे. दैवबलत्तर या कारमधील सर्वजण बचावले. यावेळी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या घटनेची माहिती समजताच पोलीस या ठिकाणी पोहोचून वाहतूक नियंत्रणात आणण्यात आली.

Web Title: Accident of three vehicles on Nashik-Pune highway

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here