Home संगमनेर संगमनेर तालुक्यात पुन्हा निर्बंध लागू, जाणून घ्या निर्बंध

संगमनेर तालुक्यात पुन्हा निर्बंध लागू, जाणून घ्या निर्बंध

Sangamner Break the Chain again

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात रुग्ण संख्या कमी होत असली तरी नगर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्या संगमनेर तालुक्यात आढळून येत आहे. कोरोनाचा आणखी प्रादुर्भाव वाढू नये यासाठी स्थानिक प्रशासन व व्यापारी असोसिएशन यांचे संयुक्त बैठकीत निर्बंध बाबत निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी प्रांतधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.   

संगमनेर शहर व तालुक्यातील सर्व व्यावसायिक, दुकानदार यांना कळविण्यात येते की, स्थानिक प्रशासन व व्यापारी असोसिएशन यांचे संयुक्त बैठकीतील निर्णयानुसार  संगमनेर तालुक्यातील सर्व आस्थापना, दुकाने, कार्यालये सकाळी सात वाजेपासून ते सायं. ५ वा पर्यंत सुरू राहतील. सायंकाळी पाच वाजेनंतर फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत, इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे निर्बंध दिनांक १० जून पासून लागू होणार आहेत,

  • सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व अस्थापना सुरु राहतील.
  • सायंकाळी ५ वाजेनंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद राहतील.

Web Title: Sangamner Break the Chain again

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here