वेबसिरीजमध्ये कामाचे आमिष दाखवून अश्लील व्हिडियो चित्रीत आणि व्हायरल
मुंबई: वेबसिरीजमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष देऊन एका मॉडेलचे अश्लील व्हिडियो (pornographic video) चित्रित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी दिग्दर्शक आणि त्यांच्या साथीदारांनी मॉडेलला बंगल्यात बोलावून तिचे अश्लील व्हिडियो शूट करत सोशियल मेडीयावर व्हायरल करत मॉडेलची बदनामी करण्यात आली आहे.
यातील पिडीत तरुणी व्यवसायाने एक मॉडेल आहे. तिने मोडेलिंगमध्ये काही काळ काम केल्यानंतर आता ती बॉलीवूड क्षेत्रात काम मिळविण्यासाठी प्रयत्न करत होती. दरम्यान दिग्दर्शक असलेल्या एका व्यक्तीने तिला फोन केला आपण वेबसिरीज चित्रित करत असल्याचे तिला सांगण्यात आले आहे. या वेबसिरीजमध्ये मुख्य भूमिका देण्याचे आमिष दिग्दर्शानाकडून दिले. वेबसिरीजच्या नावाखाली मॉडेलचे काही अश्लील व्हिडियो चित्रित करण्यात आले. यानंतर अश्लील व्हिडियो सोशियल मेडीयावर जीजा का पिज्झा या नावाने अपलोड करण्यात आले. हा व्हिडियो सोशियल मेडीयावर पहिल्याने तरुणीला धक्का बसला. तिने लगेचच मालवणी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिग्दर्शक व त्याचे तीन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस याप्रकरणाचा तपास करीत आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. आरोपीविरोधात पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे.
Web Title: Filming a pornographic video showing the lure of work in a webseries