Home अहमदनगर संगमनेर तालुक्यातील या गावांतून जाणार रेल्वेमार्ग, होणार भूसंपादन

संगमनेर तालुक्यातील या गावांतून जाणार रेल्वेमार्ग, होणार भूसंपादन

pune-nashik railway project 2021 map

संगमनेर: बहुप्रतीक्षेत असलेला नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी जमिनीच्या मोजणीच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. संगमनेर तालुक्यातील २४ गावांमधून हा रेल्वेमार्ग जाणार आहे. या रेल्वे मार्गासाठी तब्बल ४ हजार ७६२ शेतकऱ्यांची ४४७ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. नांदूर खंदरमाळ व खंदरमाळवाडी या गावांच्या जागेची मोजणी देखील करण्यात आली आहे.

पुणे ते नाशिक हा २३५ किलोमीटरचा रेल्वे मार्ग असणार आहे. पुणे नगर व नाशिक या तीन जिल्ह्यातून हा मार्ग जात आहे. जवळपास ताशी १८० किलोमीटरचा रेल्वेचा वेग असणार आहे. या रेल्वे मार्गात १८ बोगदे असणार आहेत.

संगमनेर तालुक्यातील केळेवाडी, माळवाडी, बोटा, एलखोपवाडी, नांदूर खंदरमाळ, खंदरमाळवाडी, जाम्बूत, साकुर, पिंपळगाव देपा, कोळवाडे, पिंपरणे, जाखुरी, खराडी, जोर्वे, कोल्हेवाडी, समनापूर, अकलापूर, अंभोरे, पोखरी हवेली, पारेगाव खुर्द, नानज दुमाला, पिंपळे, निमोण, सोनेवाडी या गावांतून हा रेल्वेमार्ग जाणार आहे. या २४ गावांपैकी पोखरी हवेली या गावातून सर्वाधिक जमिनीचे संपादन होणार आहे. या २४ गावांतील ५८१ शेतकऱ्यांची ३४ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. भूसंपादन करताना थेट खरेदी होणार आहे. ज्या भागातून रेल्वे जाणार आहे. त्या भागातील शेतकऱ्यांना नोटीसा देण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.

हा प्रकल्प तब्बल साडे सोळा हजार कोटीचा आहे.   ती वर्षात हा प्रकल्प पूर्ण करावा असा महारेलचा विचार आहे. यामुळे दळणवळण सुविधा चांगली होणार आहे.   

Web Title: pune-nashik railway project 2021 map

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here