Home संगमनेर संगमनेर आगारातुन होतोय प्रवाश्यांच्या जीवाशी खेळ – तीन गाडयांचे चाके निखळली.

संगमनेर आगारातुन होतोय प्रवाश्यांच्या जीवाशी खेळ – तीन गाडयांचे चाके निखळली.

संगमनेर आगारातुन होतोय प्रवाश्यांच्या जीवाशी खेळ तीन गाडयांचे चाके निखळली.

संगमनेर : –  संगमनेर एसटी आगारच गलथच्या कारभारामुळे व नादुरुस्ती बसेसचे वेळोवळी होत असलेल्या अपघातामुळे प्रवाश्यांचा जीव धोक्यात आला आहे. मागील दहा दिवसात संगमनेर आगारच्या तीन गाडयांचे चाक भर रस्त्यात निखळुन पडले. सुदैवाने यातिनही अपघातात प्रवाशांना इजा झाली नाही. परंतु अशाच प्रकारचा गलथान कारभार प्रवाश्यांच्या जीवावर बेतु शकतो. त्यामुळे एस.टी. प्रशासनाच्या कारभारावर सर्वत्र संताप होत आहे.

You May Also LikeSuhana Khan age, Birthdate, Biography, height

पुणे-नाशिक महामार्गावर घारगाव येथे नुकतेच शिवशाही बसचे चाक निखळुन पडल्याची घटना ताजी असतांनाच दि. ४ सप्टेंबर २०१८ रोजी संगमनेर येथुन पुणे येथे सकाळी ५.३० ला सुटणारी बस क्र. ३४३८ या बसचे नारायणगावात जवळ असलेल्या कळंब गावाजवळ पुढचे चाक निखळुन पडले. यावेळी बसमध्ये सुमारे ६० प्रवासी होते. सुदैवाने चालकाने लगेच बसवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर संगमनेर-समशेरपुर बस क्र. ३५२२ या बसचे चाक ररस्त्यावर निखळुन पडले या दोन घटना घडल्यानंतरही येथील आगार प्रमुख व आगार व्यवस्थपकांना जाग आली नाही. काल गुरुवार दि.६/९/२०१८ रोजी पुन्हा संगमनेर-पिंपळगावमाथा बस. क्र. ८६०५ या बसचे चाक रस्त्यातच निखळुन पडले.  वारंवार होणाऱ्या या अपघातामुळे प्रवश्यांमध्ये भितीची लाट पसरली आहे.

एकीकडे एस.टी. प्रवाश्यांची संख्या दिंवसेदिवस वाढत चालली आहे. स्वच्छता व सुरक्षा या समस्येंकडे दुर्लक्ष तसेच खासगी वाहनांपेक्षा जास्त भाडे यामुळे प्रवाश्यांनी एस.टी. बसकडे पाठ फिरावली आहे. त्यातच नादुरुस्त बसेस त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष यामुळे बसवरील चालक वाहकांसहित प्रवास्यांच्या  जीव ही धोक्यात आला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करत संबंधीतांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.  


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here