Home अकोले अकोले: राज्यातील व केंद्रातील सरकार शेतकरी विरोधी – अजित पवार

अकोले: राज्यातील व केंद्रातील सरकार शेतकरी विरोधी – अजित पवार

अकोले: राज्यातील व केंद्रातील सरकार शेतकरी विरोधी – अजित पवार 

अकोले: – केंद्रात व राज्यात जातीवादी तसेच शेतकरी विरोधी असणारे भाजप सरकार कार्यरत आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी मिळावी यासाठी आम्ही सातत्याने आंदोलन केले, त्यामुळे सरकारला जाग आली व शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळाली. ज्येष्ठे नेते मधुकर पिचड यांनी अकोले तालुक्यातील धरणचा तालुका बनविण्याचे स्वप्न पाहिले होते. ते स्तप्न पळसुंदे आणि पिंपळगाव खांड धराणामुळे पुर्ण झाले आहे. त्याचा आपल्या सर्वांना मनस्व‍ि आनंद झाला आहे. या धरणांमुळे येथील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार असल्याचे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

You May Also LikeSuhana Khan age, Birthdate, Biography, height

पळसुंदे व पिंपळगाव खांड धरणाचे जलपुजन  व लोकार्पण सोहळा अजित दादा पवार व मागील मंत्री आ. शशिकांत शिंदे यांच्या हस्ते पार पडला यावेळी पवार बोलत होते. अध्यक्षस्थांनी जेष्ठ नेते मधुकर पिचड होते. या प्रसंगी आ. वैभवराव पिचड जिल्हा बँकेचे अध्यक्ष सिताराम गायकर, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फापळे,  संदिप वर्पे,  जि.प.चे अर्थ व बांधकाम सभापती कैलास वाकचौरे, युवक प्रदेशचे अध्यक्ष संग्राम कोते, युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार मिनानाथ पांडे, मधुकर नवले उपस्थ‍ित होते. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना नुकसान होत असल्याचा आरोप अजितदादा पवार यांनी केला.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here