Home अहमदनगर घरफोडीतील तीन  आरोपी पकडले

घरफोडीतील तीन  आरोपी पकडले

घरफोडीतील तीन  आरोपी पकडले

श्रीरामपुर शहर पालिसांची कारवाई

श्रीरामपुर:  शहरात झालेल्या चार चोऱ्यांचा तपास लावण्यात शहर पोलिसांना यश आले असुन तीन आरोपींना श्रीरामपुर शहर पोलिसांना  पकडले आहेत. 

You May Also LikeSuhana Khan age, Birthdate, Biography, height

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि.१६ऑगस्ट रोजी रात्री अशोक नुरसय्या इराबती(रा. ईराबती सदन , दत्त मंदिराजवळ , वॉर्ड क्रमांक ३) याच्या घराचे कुलुप तोडुन सुमारे सव्वादोन लाख रुपयांची चोरी झाली होती. या प्रकरणाचा तपास श्रीरामपुर शहर पोलीस करत होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे व पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपींना पकडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत , हेड कॉन्स्टेबल संजय काळे, पोलीस नार्दक , जोसेफ साळवी, पोलीस नाईक साईनाथ राशिनकर, कॉन्स्टेबल पंकज गोसावी , अमोल गायकवाड, प्रमोद जाधव, फळसे यांचे पथक तयार करण्यात आले होते. त्यांना ठिकठिकाणी तपासासाठी पाठविण्यात आले होते. तपासा दरम्यान सलिम आयुब शेख (२१, रा. वॉर्ड क्रमांक २)  यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे विचारपुस केली असता त्याचा साथीदार विशाल नितीन आवारे(रा.श्रीरामपुर ) याच्याबरोबर  मिळुन इराबती सदन येथे घरफोडी केली असल्याची कबुली दिली. आवारे यास मुंबई येथील अंधेरी येथुन ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्यातील चोरलेला माल त्याच्या घरातुन हस्तगत करण्यात आला. उर्वरित मुद्देमालही लवकरच हस्तगत केला जाणार आहे.

त्याचप्रमाणे दुसऱ्या प्रकरणात शिवाजी रस्त्यावरील सई पेहराव या दुकानात चोरी झाल्याबाबत मुंजुषा सुनिल गलांडे (रा. शिवाजी रस्ता, श्रीरामपुर ) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी तपास सुरु असताना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन पथकाने अक्षय ऊर्फ भांग्या बाळु जाधव (वय २१, रा. श्रीरामपुर ) यास नेवासा फाटा येथुन ताब्यात घेण्यात आले. त्याच्या सांगण्यावरुन त्याने चोरलेला माल त्याच्या घरातुन हस्तगत करण्यात आला. यातील २ लाख ६३ हजार रुपये किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच प्रसाद क्रॉकरी या दुकानातही चोरी केल्याचे या आरोपींनी कबुल केले आहे.  


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here