सावळविहीर येथे मंदिरावर पिकअप धडकली, दोन जखमी
सावळविहीर येथे मंदिरावर पिकअप धडकली, दोन जखमी
शिर्डी : – नगर -मनमाड रस्त्यावर राहाता तालुक्यातील रुई फाटयाजवळील मंदिरावर डाळींबाचे कॅरेट घेऊन जाणारी पिकअप गाडी धडकल्याने दोघे जण जखमी झाले. यात मंदिाराची भिंत पडली असुन गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे.
You May Also Like: Suhana Khan age, Birthdate, Biography, height
गुरुवार दि.६ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास नगर-मनमाड महामहामार्गावरुन शिर्डीकडुन कोपरगावच्या दिशेने डाळिंबचे कॅरेट घेऊन जाणारी पिकअप व्हॅन समोरुन आलेल्या खासगी बसला वाचविण्याचा प्रयत्नात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने थेट दुसऱ्या बाजुला जाऊन देवीलक्ष्मी मातेच्या मंदिराला भिंत तसेच जाहीरातफलक पडले. गाडीच्या समोरील बाजुचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या दोघे जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.