संगमनेर : घुलेवाडीत स्वाईन फ्लु सदृश आजाराने बळी
घुलेवाडीत स्वाईन फ्लु सदृश आजाराने बळी
संगमनेर: – शहरानजीक असणाऱ्या घुलेवाडी येथील रहिवासी प्रकाश चंद्रभान पानसरे (वय ५०) यांचे स्वाईन फ्लु सदृश आजाराने शुक्रवारी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले.
You May Also Like: Suhana Khan age, Birthdate, Biography, height
याबाबत समजलेली माहिती अशी की, तालुक्यातील घुलेवाडी येथील प्रकाश चंद्रभान पानसरे यांना दोन ते तीन दिवसांपुर्वी सर्दी , खोकला व तापाची लक्षणे दिसु लागली. त्यानंतर त्यांनी घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले. त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला त्यानंतर त्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
नाशिक येथे उपचार सुरु असताना शुक्रवारी पहाटे त्यांचा मृत्यु झाला. याबाबत पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश घोलप यांच्या शी संपर्क साधला असता पानसरे यांचा मृत्यु नेमका कशाने झाला. याचा वैघकिय अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे सांगितले. मात्र त्याचा निमोनिया या आजारने मृत्यु झाल्याच्या वृताला त्यांनी दुजोरा दिला आहे. मयत पानसरे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी , मुलगा दोन मुली असा परिवार आहे. त्यांचावर घुलेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. वातावरण बदलाचा परिणाम जाणु लागल्याने अनेकांना साथीच्या रोगाचा त्रास सहन करावा लागत आहे.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.