Home अहमदनगर अहमदनगर संघाच्या मुलींनी जालना मुलींच्या संघाचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकावला

अहमदनगर संघाच्या मुलींनी जालना मुलींच्या संघाचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकावला

अहमदनगर संघाच्या मुलींनी जालना मुलींच्या संघाचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकावला

अहमदनगर: दिनांक १ व २ सप्टेंबर २०१८ ५ वी राज्यस्तरीय विटी-दांडू (गिल्ली- दंडा) ज्युनियर, व  सब-ज्युनियर मुली, मुले अजिंक्यपद स्पर्धा आयोजित,  उमा विद्यालय, मोडलिंब, ता. म्हाडा, जिल्हा सोलापूर याठिकाणी राज्यातून मुलींचे एकूण ७ व मुलांचे ८ संघ सहभागी। त्यामधून मुलींचा अंतिम सामना जालना विरुद्ध अहमदनगर यांच्या मधे अत्यंत चुरशीच्या आशा सामन्यात अहमदनगर संघाच्या मुलींनी जालना मुलींच्या संघाचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकावून आपली विजयी मालिका चालू ठेवली.
अहमदनगर मुलींचा संघाची वेणू सारूक्ते(कर्णधार) हिला सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.सहभागी मुली रोहिणी लोटे, प्रीती पवार,ललिता झोले, प्रियंका घाणे, सुमन नवणे,चंद्रकला मेंगाळ,प्रियांका उभे,वंदना उभे या मुलींचा समावेश होता
त्याचबरोबर मुलांचा अंतिम सामना अहमदनगर विरुद्ध जालना संघात अतिशय अटीतटीच्या या सामन्यात अवघ्या २ गुणांनी अहमदनगर संघाला पराभव पत्करावा लागला, व त्यांना दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले, साखळी पद्धतीने झालेल्या या सामन्यानमधून उत्कृष्ट खेळाडू म्हणून अमोल सोनवणे यास गौरविण्यात आले. संघात गणेश पवार(कर्णधार), दिलीप बांबळे, संदीप घाणे, भगवान जाधव,केशव धोंडे,नामदेव सोनवणे,योगेश सोनवणे, दत्ता सोनवणे,  तानाजी असवले हे खेळाडू होते.
उदघाटन प्रसंगी लोकनेते, राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त २दिवस पार पडलेल्या या ठिकाणी श्री.प्रशांत नावगिरे सर, ( महासचिव महाराष्ट्र विट्टी दांडू असोसिएशन) श्री. नवनाथ गेंड सर(महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ अध्यक्ष, शिक्षक भारती श्री. सोमनाथ पाटोळे(सोलापूर विदा. सचिव), श्री. विठ्ठल बांगर साहेब, वाकी (अहमदनगर विदा.उपाध्यक्ष),श्री. संतोष उंबरे , सचिव व श्री. वसंत उंबरे, प्रशिक्षक व खजिनदार(अहमदनगर विदा. असोसिएशन) व  सहभागी जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. विजयी संघाचे सर्व ठिकाणी अभिनंदन व कौतुक होत आहे 
श्री. डॉ. किरण लहामटे जिल्हा परिषद सदस्य,(अध्यक्ष अहमदनगर विदा. सोसिएशनच) यांनी सर्व खेळाडू व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आदिवासी व दुर्गम असलेल्या अकोले तालुक्यातील मुलांना ही संधी उपलब्ध करून देण्याचे महत्वाचे काम श्री संतोष उंबरे सर व श्री वसंत उंबरे सर हे दोघे भाऊ खूप मेहनत घेऊन करत आहेत.
यांचेही विभागातू कौतुक होत आहे. विजय संघ व  सर्व पदाधिकारी यांचे खूप खूप अभिनंदन.

आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


websites


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here