Home अकोले राजुर: अकोले आगाराच्या निषेधार्थ विद्यार्थी रस्त्यावर

राजुर: अकोले आगाराच्या निषेधार्थ विद्यार्थी रस्त्यावर

अकोले आगाराच्या निषेधार्थ विद्यार्थी रस्त्यावर

राजुर: – अकोले तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील प्रवाशांना ने-आण करणाऱ्या एसटी बस गाडया वेळेवर येत नसल्याच्या निषेधार्थ राजुर बसस्थानकात मेचकरवाडी महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी आंदोलन केले.

You May Also LikeSuhana Khan age, Birthdate, Biography, height

आदीवासी विभागाचे केंद्रबिंदु असलेल्या राजुर येथे शिक्षण व दळवळणासाठी रोज आदिवासी भागातुन मोठया संख्येने विद्यार्थी व नागरिक येतात. त्यातच राजुर विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींची संख्या हजाराच्या घरात असुन यातुन एसटी महामंडळाला लाखो रुपयांचा महसुल मिळत असतो. अकोले आगारांतर्गत राजुर बसस्थानकातुन आदिवासी भागात फेऱ्या मारणाऱ्या १३ एसटी बसगाडया आहेत. काही महाविद्यालय सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात भरत असल्याने दिवसभर विद्यार्थ्यांच्या वर्दळ असते; परंतु काल सकाळच्या सत्रातील महाविद्यालय सुटल्याने विद्यार्थ्यांना घरी जायचे होते. मात्र १२.२० ची मेचकरवाडी नादुरुस्त झाल्यामुळे एसटी बस वेळेत आली नाही. या गाडीच्या बदल्यात पर्यायी गाडीची व्यवस्था न केल्याने मेचकरवाडी, साकीरवाडी या परिसरात जाणाऱ्या  विद्यार्थ्यांच्या गैरसोय झाली.  दुपारी राजुरमधुन मेचकरवाडी, साकीरवाडी, बलठण, गोंदुशी या गावांकडे जाणाऱ्या एसटी बस न आल्याने अकोले एसटी बसआगारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले . वेळेवर एसटी बसगाडया सोडाव्यात , नादुरुस्‍त गाडया वेळेत दुरुस्त कराव्यात, बसस्थानक पिण्याच्या पाण्‍याची सुविधा करावी, बसगाडया सर्व स्टॉपवर थांबव्यात. अशा विविध मागण्या वाहतुक नियंत्रकाकडे आंदोलकांनी केल्या.

विद्यार्थ्यांना मेचकरवाडी, गोंदुशी बलठण, शेलद या गाडा त्वरित उपलब्ध करुन दिल्या शिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भुमिका घेतली. तब्बल दोन तासानंतर पोलीस हेड कॉ. रावसाहेब कदम, डगळे, नितीन सोनवणे व उपसरपंच गोकुळ कानकाटे यांनी विद्यार्थी आणि वाहतुक नियंत्रक यांच्यात मध्यस्थी केली. तर अकोले आगार प्रमुख यांच्या आदेशानुसार सर्व एसटी बसगाडया वेळेत सुटतील, असे लेखी आश्वासन विद्यार्थी आंदोलकांना राजुर बसस्थानकच्या वाहतुक नियंत्रक डी.व्ही. खाडे व एल.एम. उगले यांनी दिले. बस गाडया उपलब्ध करुन देण्यात आल्या.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


1 COMMENT

  1. कधीच बस वेळेवर नसतात त्यामुळे विद्यार्थ्यांना खुप त्रास होतो आणि

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here