संगमनेर: वाघापुरमध्ये आदिवासी महिलेशी अत्याचार, बलात्कारसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा
वाघापुरमध्ये आदिवासी महिलेशी अत्याचार
आरोपीवर बलात्कारसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
ग्रामसभा घेऊन घटनेचा निषेध
संगमनेर: – सालगडी म्हणुन शेतात काम करीत असणाऱ्या एका आदिवासी कुटुंबातील ३२ वर्षीय महिलेवर गावातीलच एका इसमाने चाकुचा धाक दाखवुन बलात्कार केला. ही संतापजनक घटना तालुक्यातील वाघापुर येथे गुरुवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडली. याप्रकरणी आरोपीविरुध्द शहर पोलीसांनी बलात्कारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे. या घटनेने गावात संतापाचे वातावरण असुन ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन या घटनेचा निषेध केला.
You May Also Like: Suhana Khan age, Birthdate, Biography, height
या बाबत माहिती अशी की, तालुक्यातील वाघापुर शिवारातील वाकाणा वस्ती येथे एक आदिवासी कुटुंब एका शेतकऱ्यांच्या शेतात नसल्याने शेतात सालाने कामाला आहे. शेतातच ते एका छोटया घरात राहतात. दरम्यान गुरुवारी पिडीत महिलेचा पती दुपारी कामासाठी बाहेर गेला होता तर मुले शाळेत गेली होती. त्यामुळे पिडीत महिला एकटीच घरी होती. या संधीचा गैरफायदा घेत आरोपी संदीप उर्फ चंद्रकांत दत्तात्रय दिघे(वय ३५) रा. वाघापुर हा सदर महिलेचा घरात घुसला व तीचे तोंड, गळा दाबुन चाकुचा धाक दाखवुन तीच्यावर बलात्कार केला. यावेळी पिडीत महिलेने प्रतिकार करण्याचा व आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र आजुबाजुला एकही घर नसल्याने या महिलेला आरोपीच्या तावडीतुन वाचविण्यासाठी कुणीही आले नाही.
पिडीत महिलेचा पती घरी आल्यानंतर तीने घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली. त्यानंतर पिडीत कुटुंबाने काही ग्रामसभांच्या मदतीने शहर पोलीसांत आरोपी विरुध्द फिर्याद दिली. त्यांनुसार शहर पोलीसांनी आरोपी संदीप दत्तात्रय दिघे यांच्या विरुध्द गुन्हा रजी.नं. २९४ /२०१८ कलम ३७३ , व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असुन पोलिस त्याचा शोध घेत आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अशोकराव थोरात करीत आहे. या घटनेची माहिती समजताच कामगार पोलीस पाटील ॲङ नानासाहेब शिंदे, सरपंच. शिवाजी चिंतामण शिंदे यांच्यासह काही ग्रामस्थांनी पिडीताच्या घरी भेट देऊन त्यांना दिलासा दिला.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.