Home संगमनेर संगमनेर शहरात चोरटे दुकान फोडण्यास आले मात्र

संगमनेर शहरात चोरटे दुकान फोडण्यास आले मात्र

Sangamner city try to theft shopee

संगमनेर | Sangamner: अज्ञात चोरट्यांनी काल रात्री शहरातील मेन रोड वरील एक मोबाईल दुकान दुकान फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. दुकानदाराच्या सतर्कतेमुळे व स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे चोरीचा डाव फसला. संगमनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या गस्तीसाठी अवघे दोनच पोलीस कर्मचारी कार्यरत असल्याने गुन्हेगारांचे चांगलेच फावले आहे.

काल मध्यरात्री तिघा चोरट्यांनी तवेरा या गाडीतून संगमनेर शहरात प्रवेश केला. रात्री अडीच वाजेच्या सुमारस या चोरट्यांनी शहरातील मेन रोड परिसरातील मोबाईल दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. दुकानात झोपलेल्या एका जणास चोरट्याची चाहूल लागल्याने त्याने त्वरित हालचाली केल्या. त्याने माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे यांना चोराबाबत माहिती दिली. कर्पे यांनी त्वरित पोलिसांना याबबतची माहिती दिली. श्री कर्पे व त्यांची कन्या घराबाहेर आले १५ मिनिटांत पोलीसही घटनास्थळी पोहोचले दुकानदाराच्या सतर्कतेमुळे चोरटे पळून गेले.

दरम्यान संगमनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलिसांची संख्या खूप कमी आहे. अवघे चारच कर्मचारी रात्रपाळी करतात. डबीच्या कर्मचाऱ्यांचे शहरातील वाढत्या गुन्हेगारीकडे दुर्लक्ष असल्याने शहरामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

Web Title: Sangamner city try to theft shopee

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here