Home अकोले अकोलेतील मटकाकिंगवर कारवाई, या ठिकाणी अकोले पोलिसांचा छापा

अकोलेतील मटकाकिंगवर कारवाई, या ठिकाणी अकोले पोलिसांचा छापा

Crime News Action on mutkaking in Akole

अकोले | Crime News: अकोले शहरातील कारखाना रोडच्या कडेला एका टपरीच्या आडोशाला मटका नावाचा हार जीतीचा जुगार खेळताना व खेळविताना जुगाराच्या साहित्यासह ११ रुपयांची रोख रकमेसह अकोले पोलिसांनी एकास रंगेहाथ पकडून गुन्हा दाखल केला आहे.

अगस्ती कारखाना रोडच्या कडेला एका टपरीच्या आडोशास सुधाकर विठ्ठल फटांगरे रा. इंदिरानगर ता. अकोले यास मटका खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याबाबत अकोले पोलीस ठाण्यात पोलीस नाईक विठ्ठल मंजाबापू शेरमाळे यांनी फिर्याद दिली आहे.

यह व्हिडीओ देखकर आप नोकरी करना नही सोचेंगे  

या फिर्यादीत म्हंटले आहे की, अकोले शहरातील अगस्ती कारखाना रोडच्या कडेला एका टपरीच्या आडोशाला सुधाकर विठ्ठल फटांगरे हा लोकांकडून पैसे घेऊन कागदाच्या चिट्ठीवर आकडे घेऊन विनापरवाना बेकायदेशीर कल्याण मटका नावाचा हार जीतीचा जुगार लोकांकडून पैसे घेऊन खेळताना व खेलाविताना मिळून आल्याने अकोले पोलीस स्टेशनला जुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आहेर हे करीत आहे.

Web Title: Crime News Action on mutkaking in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here