Home क्राईम संगमनेर: अल्पवयीन मुलीला अश्लील मेसेज करून त्रास देणाऱ्या तरुणास अटक

संगमनेर: अल्पवयीन मुलीला अश्लील मेसेज करून त्रास देणाऱ्या तरुणास अटक

Sangamner Crime arrested for harassing minor girl

Sangamner Crime | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात एका अल्पवयीन मुलीला फोन वरून मेसेज व अश्लील व्हिडियो कॉल करून तसेच पाठलाग करून छळ केल्याने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात एका तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आली असून न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत अल्पवयीन मुलीने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार प्रशांत भाऊराव नेहे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.  

वाचा: ahmednagar News

याबाबत माहिती अशी की, आरोपी प्रशांत नेहे हा संबंधित मुलीचा पाठलाग करून त्रास देत होता. तसेच ती अभ्यास करीत असलेल्या वडिलांच्या मोबाईलवर तू मला खूप आवडतेस आणि अश्लील मेसेज करून त्रास देत होता. तसेच व्हिडियो कॉल करून लज्जा उत्पन्न होईल असेल कृत्य करीत होता. त्याच्या याच त्रासाला कंटाळून मुलीने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. हा प्रकार जवळपास एक महिन्यापासून सुरु होता.

Web Title: Sangamner Crime arrested for harassing minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here