Home महाराष्ट्र ब्रेकिंग: शिवसेनेच्या दिग्गज नेत्याचे निधन

ब्रेकिंग: शिवसेनेच्या दिग्गज नेत्याचे निधन

Sudhir Joshi passes away

मुंबई | Sudhir Joshi passes away:  शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे निधन झाले आहे. ते  81 वर्षाचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती. मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण  झाली होती. त्यांच्यावर मुंबईतील जसलोक उपचार सुरू होते. ते नुकतेच करोनाच्या आजारातून बरे होऊन घरी परतले होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.  सुधीर हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी मानले होते.  शिवसेना पक्ष संघटनेत सुधीर जोशी यांची महत्वपूर्ण भूमिका आहे. ते शिवसेनेचे मुंबईचे दुसरे महापौर होते. त्यांनी मुंबईचा महापौर ते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्रीपद भूषवले होते. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Sudhir Joshi passes away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here